Solar pump सौर पंपाच्या किमतीत वाढ; नवीन किंमती पहा..
Solar pump ; देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान कुसुम सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जात आहे. सरकारकडून सौरऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सौर पंपाच्या किमतीत ६००० ते १२००० ने वाढ करण्यात आली आहे. सौरपंपांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. (Solar pump update)
यंदा २०२४ मध्ये सौर पंपाची किंमत ६००० ते १२००० रु. सौर पंपाच्या किंमती HP नुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. ते पाहूया आता शेतकऱ्यांना 3/HP, 5/HP, 7-5/HP साठी किती रुपये द्यावे लागतील.
हे वाचा – आज या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस ; या जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा
1) २०२३ मध्ये खुल्या वर्गासाठी 3/HP पंपाची किंमत रु.१७०३०होती आता २०२४ मध्ये ती वाढून रु.२२९७१ झाली आहे. यामध्ये ५९४१ रुपयांची वाढ झाली आहे.
2) खुल्या वर्गासाठी 5/HP सौर पंपाची किंमत आता रु. ३२०७५ आहे.
3) तसेच 7-5/HP सोलर पंपाची किंमत रु.३२९०० होती ती आता रु.४४९२८ वर आणली आहे. (खुल्या वर्गासाठी)
सौरपंपांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच शेतकऱ्यांना ज्या कंपनीतून सौरपंप निवडायचा आहे, त्याचा कोटा संपला आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी नाईलाजाने निवडावी लागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
हे वाचा – मान्सून रविवारी अंदमानात येणार या तारखेला राज्यात हवामान विभागाची घोषणा
मान्सून रविवारी अंदमानात येणार हवामान विभागाचे संकेत ; पोषक वातावरण तयार…