cotton top veriyti कापसाचे टाॅप 05 बियाण्यांचे वाण अधिक उत्पादन देणाऱ्या जातीं
नमस्कार शेतकरी मित्रांनो , महाराष्ट्रात तसेच देशात कापुस हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे नगदी पीक आहे. या लेखात कापसाच्या टाॅप 05 जातींची माहिती घेणार आहोत. हे कापसाचे सर्वोत्कृष्ट वाण असुन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळऊन देणाऱ्या आहेत. शेतकरी मित्रांनो कापसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य जातींची निवड , योग्य खतव्यवस्थापन , तनव्यस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन करणे अतीशय महत्वाचे असते या सर्व गोष्टी वेळेवर केल्या तर आपण कापसाचे रेकाॅर्डब्रेक उत्पादन घेऊ शकतो.तरी कापसाच्या टाॅप 05 जातींची माहिती या लेखात जाणून घेऊया.
1) कब्बडी (kabbdi)
cotton seed top variety 2023 :- राज्यात कबड्डी हा वाण गेल्या 2 वर्षांपासून खुप शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे या वानांची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करु शकता. या वाणाची खास करून कोरडवाहु व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.अधिक उत्पादन देणारे हे वाण असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितले जातंय .
या वानाची वैशिष्ट्ये : मध्यम भारी जमीनीसाठी योग्य, बागायती आणि कोरडवाहू जमीनीत लागवड करता येते.कालावधी 160/180 दिवस, बोंडाचा आकार मोठा , बोंडाचे वजन 5/6 ग्रॅम, रसशोषक किडीस सहनशील , एकरी उत्पादन 08/15 क्विंटल.
2) राशी 659
राशी 659 हा वाण शेतकऱ्यांचा बऱ्याच वर्षांपासून पसंतीचा वाण आहे.या वाणाची बागायत आणि सिंचनासाठी शिफारस केली आहे. ठिबक सिंचनाचावर याची लागवड करावी. राशी 659 या वाणाची वैशिष्ट्ये : मध्यम ते भारी जमीनीसाठी शिफारस, कालावधी 145/160 दिवस , बोंडाचे वजन 5/6 ग्रॅम वेचणीस सुलभ, रसशोषक किडीस सहनशील, उत्पादकता 7/12 क्विंटल एकरी.
3) अजित 155
हा वाण पाण्याचा ताण सहन करण्यास सहनशील असल्यामुळे हे वाण हलक्या व कोरडवाहू जमिनीत देखील घेता येतो. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावर शेतकरी या वाणाचा जास्त प्रमाणात वापर करतात.हे वाण आपण हलक्या,माध्यम व भारी जमिनीत सुद्धा घेऊ शकतो.या वाणाचा बोन्डाचा आकार काहिसा लहान असतो मात्र जास्त बोन्डाची संख्या येत असल्याने अधिक उत्पन्न मिळते.अजित 155 हे कमी कालावधीचे वाण आहे. कोरडवाहू जमिनीत कमी अंतरावर लागवड करावी. 155 या वानाची वैशिष्ट्ये ; हलक्या- मध्यम-भारी जमीनीसाठी योग्य, कालावधीत 145/160 दिवस ,बोंडाचा आकार मध्यम बौंडाचे वजन 5/5.5 , उत्पादन 8/10 क्विंटल एकरी,वेचणीस सोपा.
4)US 7067 :- यु.एस. 7068
हे वाणाची शिफारस माध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आली असली तरी हे वाण हलक्या जमिनीत देखील चांगले उत्पादन मिळवुन देते.हे वाण विविध रोग व सरशोषक किडीसाठी प्रतिकारक आहे व दाट लागवडीसाठी हे वाण चांगले आहे.बोन्डाचे वजन चांगले असून गोल व मोठ्या बोन्डाचे वाण आहे. या वाणाची वैशिष्ट्ये : जमिन मध्यम भारी, कालावधी 155/160 दिवस , बौंडाचा आकार मोठा व वजनदार, बोंडाचे वजन 5/6 ग्रॅम , वेचणीस सोपा , रसशोषक किडीस सहनशील, उत्पादकता 7/10 क्विंटल एकरी.
5) supercot सुपरकाॅट
Cotton top variety 2023 :- वरील ईतर वाणा प्रमाणे 2022 मध्ये प्रभात सीड्स च्या सुपरकॉट (supercot ) या वाणाने सुद्धा सर्वोत्कृष्ट उत्पादनचा विक्रम नोंदविला आहे. सुपरकाॅट हे वाण मोठ्या बोंडाचे असून भरपूर शेतकऱ्यानी या वाणाला पसंती दिली आहे.हे वाण रसशोषक किडीस व लाल्या रोगासाठी अधिक प्रतिकारक आहे. शेतकऱ्यानी या वाणापासून 10 ते 12क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले आहे. supercot सुपरकाॅट या वाणाची वैशिष्ट्ये : मध्यम भारी जमीनीसाठी शिफारस, कोरडवाहू आणि बागायती जमीनीस लागवड करता येते, कालावधी 160/170 दिवस ,बोंडाचा आकार मोठा, बोंडाचे वजन 5/6 ग्रॅम , वेचणीस सोपा, एकरी उत्पादकता 7/12 क्विंटल.
याशिवाय आणखी खूप वाण चांगल्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या मागिल वर्षीचा अनुभव तसेच इतर शेतकऱ्यांच्या अनुभवातून आपण बियाण्याची निवड करावी. योग्य खत व्यवस्थापन, सिंचनाची सोय, तन नियंत्रण आणि फवारण्या या सर्व गोष्टींवर कापसाचे उत्पादन ठरत असते..