अकोला विद्यापिठाच्या सोयाबीनचे वैशिष्येपुर्ण वाण पेरा एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन (एएमएस 100-39 आणि एएमएस 1001)
आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असून मध्यप्रदेश नंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण क्षेत्रापैकी 48 ते 50 % क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा असतो. यामध्ये विदर्भातील सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राने आतापर्यंत 06 वाण विकसित केले आहे. दुष्काळी परिस्थितीत तसेच अतिवृष्टी परीस्थितीत सुद्धा या वाणातुन चांगले उत्पादन होत असल्याने लवकरच हे वाण लोकप्रिय होताना दिसत आहे.
अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोन वाणाची सविस्तर माहिती पाहुया..
1) पीडीकेव्ही अंबा (एएमएस 100-39)
पीडीकेव्ही अंबा (एएमएस 100-39) हे सोयाबीन वाण लवकर परिपक्व होणारे असुन तसेच जास्त उत्पादन देणारे वाण आहे. या वाणाच्या शेंगात तीन दाण्याची टक्केवारी अधिक आहे. तसेच या वाणाच्या दाण्यांचे वजन इतर वाणांपेक्षा जास्त आहे. हा वाण प्रतीकुल हवामानात तग धरणारा आहे. शेतकऱ्यांच्या अनुभवातून या वाणांची 27 टक्के जास्त उत्पादकता नोंदविली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्याकरिता या वाणाची शिफारस अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राकडून करण्यात आली आहे.
पीव्हिकेव्ही अंबा(100-39) सोयाबीनच्या या वाणाची हेक्टरी उत्पादकता 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे. सोयाबीनचे हे वाण 95 ते 100 दिवसांमध्ये परिपक्व होणारे वाण आहे. तसेच सोयाबीनचे हे वाण मूळकुज/खोडकुज या रोगास व चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस प्रतिकारक आहे. सोयाबीनच्या परिपक्वते नंतर 10 ते 12 दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे.
हे वाचा – कापूस टाॅप वाण/जाती अधिक उत्पादनासाठी लोकप्रिय वाण / सुधारित जातीची वैशिष्ट्ये
2) पीडीकेव्ही येलोगोल्ड (एएमएस 1001) :
सोयाबीनचे हे 95 ते 1000 दिवसात येणारे हे वाण आहे. मध्यम पावसाच्या भागात तसेच पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमीनीत जास्त उत्पादन येते. या वाणांची बुलढाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडुन चांगली मागणी असते. या वाणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राकडुन शिफारस करण्यात आली आहे.
या सोयाबीन वाणाच्या फुलाचा रंग जांभळा असुन या सोयाबीन वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 95 ते 100 दिवसाचा आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता 22 ते 26 क्विंटल हेक्टरी आहे. सोयाबीनचे हे वाण मूळकुज खोडकुज व पिवळा मोझॅक या रोगांस मध्यम प्रतिकारक आहे. चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस प्रतिकारक आहे. या वाणाच्या सोयाबीनच्या परिपक्वतेनंतर 10 दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक्षमता आहे.
शेतीविषयक नवनवीन माहिती हवामान अंदाज तसेच मान्सूनच्या बातम्या बाजारभाव शेतीविषयक नवनवीन जिआर पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा.
हे वाचा – मान्सून ०७ जूनआगोदर महाराष्ट्रात लावनार हजेरी – रामचंद्र साबळे
Monsoon news ; महाराष्ट्रात ७ जुनच्या आधीच मान्सून होनार दाखल – रामचंद्र साबळे