मान्सून रविवारी अंदमानात येणार हवामान विभागाचे संकेत ; पोषक वातावरण तयार…

मान्सून रविवारी अंदमानात

मान्सून रविवारी अंदमानात येणार हवामान विभागाचे संकेत ; पोषक वातावरण तयार…

 

मान्सून ; हवामान विभागाने मान्सून अंदमानात कधी येणार याबाबत माहिती दिली आहे. मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. दि. 19/मे पर्यंत दक्षिण अंदमान समुद्राच्या लगत आग्नेय बंगालच्या उपसागर आणि अंदमान बेटावर दाखल होण्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहे. (Monsoon updates 2024)

साधारणपणे मान्सून 21/मे पर्यंत अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोहचतो. आणि त्यापुर्वी तो अंदमानात दाखल झालेला असतो. तसेच 01/जुन पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मागील वर्षी 19/मे रोजी अंदमानात आलेला मान्सून 08/जुन रोजी केरळात आला आणि 11/जुन पर्यंत तळकोकणात आला होता. पुढे मान्सूनच्या प्रगती कशी होते तसेच चक्रिवादळाचे अडथळे निर्माण होतात का या सर्व बाबीवर राज्यात मान्सूनचे आगमन कधी होईल अवलंबून असते. (Monsoon 2024)

 

हवामान विभागाने यंदा मान्सून काळात 106 % पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये 05% तफावत होऊ शकते असे आयएमडी ने सांगितले आहे. सध्या प्रशांत महासागरात काहि प्रमाणात अल निनोची स्थिती आहे तरी मान्सून काळात ला निना स्थिती सक्रिय होणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.

हवामान विभागाकडून लवकरच मान्सून केरळमध्ये तसेच राज्यात कधी दाखल होणार याबाबत तारिख जाहीर केली जाईल. तसेच मे महिन्याच्या शेवटी मान्सुनचा सुधारित अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण कसे राहिल हे स्पष्ट होईल. मान्सूनच्या प्रगतीच्या बातम्या तसेच हवामान अंदाज व इतर शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामील व्हा. तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा..

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazhashetkari

Scroll to Top