Monsoon news ; महाराष्ट्रात ७ जुनच्या आधीच मान्सून होनार दाखल – रामचंद्र साबळे
नियोजित वेळेपूर्वी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. यंदाचा मान्सून निर्धारित वेळेपूर्वी अंदमानमध्ये दाखल झाला असून 26 जूनपूर्वी मान्सून श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सून केरळमध्ये 1 जूनपूर्वी आणि महाराष्ट्रात 7 जूनपूर्वी दाखल होईल. तर 10 जूनपूर्वी मान्सून मुंबईत दाखल होईल. आणि 12 जूनपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल अषा अंदाज रामचंद्र साबळे यांनी जाहीर केला आहे.
हे वाचा – कापूस टाॅप वाण/जाती अधिक उत्पादनासाठी लोकप्रिय वाण / सुधारित जातीची वैशिष्ट्ये
हिंदी महासागर, आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 31° सेल्सियस पर्यंत वाढले आहे आणि पेरूजवळ पॅसिफिक महासागराचे तापमान 16° सेल्सियस पर्यंत कमी झाले आहे ज्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प भारताकडे वाहून नेतील. ला निनाचा प्रभाव आणि इतर अनुकूल घटकांमुळे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनचे वेळेआधीच केरळसह महाराष्ट्रात आगमन होईल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे असेल?
रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार या आठवड्यात 26 मे पर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.. कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा सुरू राहील आणि कुठे पावसाची शक्यता जास्त आहे याच्या सविस्तर माहितीसाठी हा Youtube व्हिडिओ पहा…