Rain update दोन दिवसात या भागात पावसाचा जोर वाढणार imd
Imd weather forecast ऑगस्ट पासुन राज्यात पावसात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढलीय. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर मध्ये सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. सध्या पावसाअभावी पिके सुकत आहेत तरी हवामान विभागाने शेतकऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे. येत्या दोन तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे…
यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रादुर्भाव पडल्याने जुन आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला नाही. फक्त जुलै मध्ये पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिक घेतले आहे. पेरणी नंतर ऑगस्ट मध्ये पाऊस न पडल्याने हंगामातील पिके धोक्यात आली आहे. सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस होईल असे हवामान तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पुणे हवामान विभागाचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसात पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे सांगितले आहे..
Monsoon update हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून राज्यात काही भागात मुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून वारे सक्रिय होईल व महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागात तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात चांगला पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगितले आहे..
5 Sept, IMD मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार येत्या 2,3 दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 6,7 सप्टेंबर रोजी विदर्भातील काही भाग, मराठवाडा,मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होईल
As per IMD model guidance 6,7 Sept parts of Vidarbha,adj Marathwada & Madhya Mah good rains. pic.twitter.com/AWAiKOjqwe— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 5, 2023