Onion subsidy maharashtra कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबरः पण एवढेच मिळणार अनुदान….
Onion subsidy maharashtra कांदा उत्पादक शेतकऱ्यांला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कांद्याला 350 रुपये प्रती क्विंटल एवढे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. कारण या अनुदानाचे वाटप सुरू झाले आहे. परंतु हे अनुदान शेतकऱ्यांना किती मिळणार हे सविस्तर पाहुया.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज या कांदा अनुदानाच्या वाटपास सुरूवात झाली. आजपासून अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. या अनुदानाचे वाटप महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येणार आहे. राज्यातील 03 लाख 30 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. या अनुदानासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शेतकऱ्यांना कांदा अनुदान किती मिळणार…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 800 ते 900 रूपये एवढा निधीची आवश्यकता होती परंतु सध्या 465 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून 300 कोटी रुपयांची वाटप सुरू केली आहे. प्रती शेतकऱ्यांना 10 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. व उर्वरित रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रूपये प्रति क्विंटल 200 क्विंटल च्या मर्यादेत हे अनुदान दिले जाणार आहे…
#कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला.
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा… pic.twitter.com/B3Ewl80LKp— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 6, 2023
महाडीबीटी कृषी यांत्रीकीकरण 01/सप्टेंबर ची लाॅटरी यादी डाऊनलोड करा
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी 01/सप्टेंबर/2023 Mahadbt lottery list