Maharashtra rain राज्यात जोरदार कधीपासून पडणार हवामान तज्ञ उदय देवळाणकर
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरीपातील पिके कोमेजून गेली आहे. शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहे . हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु पाऊस अद्याप आलेला नाही. अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहिल असा अंदाज वेगवेगळ्या हवामान संस्था कडून वर्तवला जात होता. त्याप्रमाणे राज्यातील पावसाचे प्रमाण कमीच आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात जुलैमध्ये चांगला पाऊस पडला आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यंदा मान्सुनचे आगमन उशिरा आगमन झाल्याने पेरणीसाठी एक महिना उशिरा झाला. आणि ऑगस्ट मध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली….
मागील वर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपातील व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातुन गेली होती. आणि यंदा कमी पावसामुळे पिके हातुन गेली आहे. आता यापुढे पाऊस चांगला पडेल की नाही याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. यापुढे चांगला पाऊस पडला नाही तर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करता येनार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे..
येत्या काळात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाऊस कसा राहिल तसेच राज्यात जोरदार पाऊस कधीपासून पडनार याबाबत सविस्तर माहिती हवामान तज्ञ उदय देवळानकर यांची विशेष मुलखत पाहूया..