Kusum solar scheme सोलार पंपासाठी हे ॲप्शन येत आहे कागदपत्रे अपलोड करावी..
Kusum scheme कुसुम सोलार योजनेअंतर्गत सोलार पंपासाठी मे महिन्यापासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले होते. सदर योजनेत इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज भरले होते. सोलार पंपाचा कोटा मर्यादेत असल्याने शेतकऱ्यांची अर्ज करण्यासाठी धावपळ करावी लागली होती..
या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी 7/12 वर विहीर किंवा बोअर ची नोंद असने आवश्यक होते. तसेच सामाईक पाण्याचा स्रोत असलेल्या लाभार्थ्यांना इतर खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होते परंतु मर्यादेत कोटा असल्याने कोटा संपण्याच्या भितीने कागदपत्रांची पुर्तता न होताच अर्ज भरले सादर करण्यात आले होते.. (Kusum solar pump yojana)
महाऊर्जा कडून सदर अर्जाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहीर किंवा बोअर असलेला 7/12 तसेच सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र अपलोड केले नाही अशा लाभार्थ्यांना आता मोबाईलवरून मेसेज द्वारे त्रुटी पुर्ण करण्यासाठी सुचित करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांना त्रुटी पुर्ण करण्यासाठी मेसेज आला असेल त्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा संकेतस्थळावर लाॅगिन करुन आपली कागदपत्रे अपलोड करावी..
सर्वसाधारण शेतकऱ्यांना खालील प्रमाणे त्रुटी आलेल्या आहेत..
1) विहिर किंवा बोअर ची नोंद नसलेला 7/12 चा उतारा…
2) सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना ईतर खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र…
जर तुमच्या लाॅगिन मध्ये Re upload हे ॲप्शन दाखवत असेल तर खालील कागदपत्रे pdf फाईल मध्ये अपलोड करा.
1) बॅक खाते पासबुक
2) 7/12 चा उतारा
3) आधार कार्ड
4) पासपोर्ट फोटो
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://kusum.mahaurja.com/benef_home
