अल निनोबाबत पंजाबराव डख काय म्हणतात havaman aandaj
अमेरिकन हवामान विगागाने मागील आठवड्यात भारतीय मान्सूनबाबद अंदाज व्यक्त केला.या अंदाजात यंदा अलनिनोच्या प्रभावाने भारतात कमी पाऊस पडेल असे सांगन्यात आले आहे. याबाबत अनेक माध्यमातून या बातम्या शेतकऱ्यांपर्यंत पसरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना येनारा पावसाळा खरच कमी पावसाचा राहील का याबाबत चिंता लागली आहे. कारण भारतीय शेती हि मान्सूनच्या पावसावर आवलंबुन आहे.
मात्र मान्सूनचा अंदाज फेब्रुवारीमध्ये बांधनं घाईचं आसल्याचं भारतीय तज्ञांनी सांगितलंय…एवढ्या लवकर दिलेल्या अंदाजात आनखी बर्याचदा बदल होऊ शकतात त्यामुळे आत्ताच याबाबत बोलनं घाईच आसल्याचं भारतीय हवामानअभ्यासक सांगतात.
कांदा चाळ योजना पुन्हा सुरु या 20 जिल्ह्यात मंजुरी
अल निनोबाबत पंजाबराव डख काय म्हणतात
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही अलनिनोबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना सांगितली आहे.पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार अल निनो या प्रनालीचा भारतीय मान्सूनवर परिणाम होत नाही. अल निनो असो कि नसो मान्सून भारतात वेळेवरच दाखल होतो.अलनिनो असो किंवा नसो मान्सून आपल्या ठरल्या वेळेतच देशासह महाराष्ट्रात दाखल होतो.पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे जर अलनिनोची परिस्थिती उद्भवली नाही आणि जरी उद्भवली तरी त्याचा भारतीय मान्सूनवर परिणाम झाला नाही तर निश्चितच हि गोष्ट महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांना दिलासादायक आसेल.
भारतीय हवामान तज्ञांचे काय मत आहे?
अमेरिकन हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवामान खात्याचे मत आहे कि मान्सून बद्दल काहीही बोलने हे घाईचे होईल. एजन्सी ने परिस्थिती पाहून अंदाज दिलेला आहे तरी त्यानंतरच्या महिण्यात काही बदल होऊ शकतो. जर एखादे माॅडेल सारखे 02 महिने अल निनो चे संकेत देत असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. असे कोट्टायम येथील इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज स्टडीजचे संचालक डि शिवानंद पै यांचे मत आहे.
अल निनो म्हणजे काय ?
अल निनो हा एक जलवायु प्रणाली चा भाग असून हवामानावर त्याचा परिणाम होतो. दर 03 ते 06 वर्षानी अल निनो ची परीस्थिती उद्भवते. मध्य आणि पूर्व विषुववृत्ताच्या प्रशांत महासागरातील पृष्ठभागावर पाणी सामान्य पेक्षा गरम होते या स्थिती ला अल निनो म्हणतात. या स्थिती मुळे वार्याची पद्धत बललते त्याचा परिणाम जगातील अनेक भागात हवामानावर होतो.