Crop insurance updates राज्यातील 08 जिल्ह्यातील मंडळाचा अग्रिम पिकविमा मंजूर जिल्ह्याची यादी पहा….
Crop insurance updates यावर्षी राज्यात अतिशय कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून 21 दिवसापेक्षा जास्त पावसात खंड असलेल्या मंडळाला अग्रिम पिकविमा देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहे. यामध्ये जिल्ह्याचा मंडळातील सोयाबीनचा पिक विमा सरसगट मंजूर करण्यात आला आहे. तर काही मंडळे हे (21 दिवसापेक्षा जास्त खंड) या निकषात बसत नसल्याने हि मंडळे वगळण्यात आली आहे…
राज्यातील पावसाने मागिल एक महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून दडी मारली आहे. यामध्ये खरीपातील सर्व पिके (कापूस, सोयाबीन, मुग,उडीद, तुर यासारख्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तरी शासनाने दुष्काळ जाहीर करून सरसगट पिकविमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..
अग्रिम पिकविम्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र झाले आहे याची संपूर्ण माहिती पाहुया…
1) बीड – बीड जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचा सरसगट पिकविमा मंजूर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांचा पिकविमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पिकविमा देण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे… अधिक माहिती येथे पहा
2) धाराशिव (उस्मानाबाद)
धाराशिव जिल्ह्यातील 36 महसूल मंडळाचा सोयाबीन पिकांचा अग्रिम पिकविमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण,अंबेजवळगे,करजखेडा, पाडोळी, तेर, ढोकी, येडशी, जागी, तुळजापूर, सलगरा दी, सावरगाव, मंगरूळ, आरळी बु, ईटकळ, तामलवाडी, उमरगा, डाळिंब, बलसुर, मुळज, बेडगा, मुरुम, लोहारा, माकणी, जवेळी,धानूरी, येरमाळा, मस्सा खं., शिराढोण, नायगाव, परंडा, आनाळा, शेळगांव, सोनारी ईत्यादी महसूल मंडळातील सोयाबीन पिकांचा पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना एक महिण्यात पिकविम्याची अग्रिम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिले आहे.. अधिक माहिती येथे पहा
3) अकोला – अकोला जिल्ह्यातील जिल्ह्याधिकारी यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार 21 दिवसापेक्षा जास्त पावसात खंड असलेल्या 20 महसूल मंडळाचा डाटा जिल्ह्याधिकारी यांच्याकडे आलेला आहे. परंतु यामध्ये नव्याने 32 महसूल मंडळाचा समावेश करुन या मंडळाचे सर्वेक्षण करून पात्र महसूल मंडळाला अग्रिम पिकविमा दिला जाईल. अद्याप हे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. अधिक माहिती येथे पहा
4) यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि ऑगस्ट मध्ये पडलेल्या खंडा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर क्लेम केले जातात. परंतु या क्लेमवर कोणतीही पुढील प्रोसेस विमा कंपनीकडून केली जात नाही. विमा कंपनीचे अधिकारी पिक पाहण्यासाठी येत नाही अशा तक्रारी येत असल्याने जिल्ह्याधिकारी यांनी क्लेम केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे…. अधिक माहिती येथे पहा
5) परभणी जिल्ह्यातील डाॅ सुभाष कदम यांनी केलेल्या मागणी नुसार जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये कमी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे कापूस, सोयाबीन, तुर यासारख्या पिकाचे पुर्ण नुकसान झाले आहे तरी सर्व जिल्ह्याला अग्रिम पिकविम्यासाठी पात्र करावे अशी मागणी केली होती. या मागणीच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील 41 महसूल मंडळाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. या अहवालानुसार ज्या महसूल मंडळात 50 % पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसून येईल त्या महसूल मंडळाला अग्रिम पिकविम्यासाठी पात्र करण्यात येईल.. खालील महसूल मंडळात सर्वेक्षण करण्यात येईल… परभणी, झरी, जांब, पेडगाव, टाकळी, पिंगळी, परभणी ग्रामीण ,हादगाव बु. कासापुरी सावंगी म्हाळसा,बाम्हणी, दुधगाव, वाघी
धानोरा, बोरी, आडगाव, चारठाणा, पूर्णा, कालेश्वर, चुडावा, कावलगाव ,पालम, चाटोरी, बनवस, वालूर, कुपटा, देऊळगाव गात, चिखलठाणा बु., मोरेगाव मानवत, कोल्हा, रामपुरी बु, ताडबोरगाव ,गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, पिंपळदरी ,सोनपेठ, आवलगाव, शेळगाव, वडगाव अधिक माहिती येथे पहा
6) लातूर – जिल्ह्यातील पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकांचा अग्रिम पिकविमा सरसगट मंजूर करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचा पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा (25%) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आधिक माहिती येथे पहा
7) नाशिक पिकविमा अपडेट येथे पहा
8) अहमदनगर पिकविमा अपडेट येथे पहा