cotton rate येत्या काळात कापसाचे भाव कसे राहतील, किती वाढतील,कापूस उत्पादनाचा&जानकारांचा अंदाज
देशातील महाराष्ट्र, गुजरात, राज्यस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र कापसाला यंदा मागील वर्षीपेक्षा कमी दर मिळत आसल्याने तीनही राज्यात कापसाची साठवणूक शेतकऱ्यांनी केलेली आहे. कापूस हंगामातील जवळपास चार महिने संपलेत तरीही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आपेक्षेपोटी कापूस घरातच ठेवलाय.कापूस विक्री करताना आतापर्यंत कधी न उचललेलं पाऊल यंदा शेतकऱ्यांनी उचललं आहे.
सध्या फक्त किरकोळ कापसाची विक्री शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना 10 हजार रूपये क्विंटलपर्यंत भाव मिळन्याची आपेक्षा होती किमान भाव 9 हजार तरी व्हावेत आसं शेतकऱ्यांना वाटतंय…..तर शेतकरी मित्रांनो येत्या काळात कापसाचे भाव कसे राहतील, किती वाढतील,कापूस उत्पादनाचा अंदाज, तसेच शेतमाल अभ्यासक आणि जानकारांचा अंदाज काय सांगतोय हि माहिती आपण या लेखातून पाहनार आहोत.
शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केलीय खरी मात्र एवढं करूनही कापसाचे भाव 9000 वरून सध्या 8 हजार ते 8300 रूपयावर आहेत.साठवणूक केलेल्या कापसामुळे आता अंगाला खाज येत आसल्याचं शेतकरी सांगतात.कापूस 9 हजार झाला कि विकुन टाकायचा,सावकाराचं देनं आहे, भाव वाढून जेवढे पैसे येनार नाही तेवढं व्याज वाढलंय अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. विदर्भ मराठवाडा भागातील कापूस हेच नगदी पिक आहे आणि यावरच सगळा संसार येथील शेतकऱ्यांचा आहे. मात्र यंदा पाऊस आणि भावामुळे शेतकरी हतबल झालाय….
13 फेब्रुवारीपासून म्हनजे कालपासून कापसाचे वायदे सुरु झाले आहेत,मात्र वायद्यामुळे कोनत्याही शेतमालाचे भाव कमी किंवा जास्त होत नाहीत. फक्त भविष्यात किंमतीचा कल कसा राहील हे समजते.मात्र वायदे सुरू झाल्यानंतर कापसाचे भाव वाढनार आशा बातम्या सध्या वायरल झाल्या आहेत. मात्र याचा भाववाढीशी थेट संबंध नाहीये.
मग कापसाचे भाव वाढतील का..? कधी वाढतील…?
👉👉 येथे क्लिक करून सविस्तर वाचा👈👈