राज्यात कापूस पोहचला 8850 रुपयावर cotton market
Cotton news मागिल बर्याच दिवसापासून कापसाच्या दरात झालेल्या घसरणीत दोन दिवसापासून सुधारणा होताना दिसत आहे. सध्या सर्वसाधारण दर जरी कायम असला तरी सर्वाधिक दराने चांगली झेप घेतली आहे. राज्यातील तसेच देशामधील काही ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर 8850 रूपये एवढा टप्पा गाठला आहे.
कांदा चाळ योजना पुन्हा सुरु या 20 जिल्ह्यात मंजुरी अर्जाची शेवटची मुदत, जाणून घ्या
दोन महिन्यापासून कापसाचे दर घसल्याने शेतकर्याने विक्री थांबवली होती. फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापसाच्या दरात काहीच सुधारणा झाली नव्हती. तसेच देशातील बाजारात कापसाची आवक वाढली होती. चालू हंगामात सुरूवातीला देशपातळीवर दैनंदिन 90 हजार लाख गाठीच्या दरम्यान आवक होती. मात्र आता त्यामध्ये वाढ होऊन सव्वा ते दिड लाख गाठीच्या दरम्यान पोहचली आहे.
आज कापसाच्या भावात एवढी वाढ…पहा आजचे कापूस बाजारभाव…
कापसाच्या बाजारभावाचा विचार करता दि.15-फेब्रुवारी रोजी देशातील अनेक बाजारात 50-100 रुपये एवढी सुधारणा झाली. सर्वाधिक दर पाहता गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये कमाल दर 8850 एवढा दर मिळाला. दि.15-फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील अकोट बाजार समिती मध्ये 8850 रुपये तर इतर बाजार समित्या मध्ये 8000 ते 8500 एवढा दर मिळाला.
खताच्या भावात मोठी वाढ जाणून घ्या नवीन 2023 मधिल खताचे दर
USDN आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे वायदे 85 सेंट प्रतीपाऊंड होते. आणि प्रत्यक्ष खरेदी दर काॅटलुक ए इंडेक्स 100 . 85 संट प्रतीपाऊंड एवढा होता. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये कापसाचे दर स्थिर असून पाकिस्तान आणि चिन अमेरिकेकडून कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे दर पातळी कायम आहे. आतांच USDN ने जगातील कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे तसेच काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया कडून देशातील कापसाचे उत्पादन 321 लाख गाठीवर स्थिरावेल असे सांगितले आहे. तरी अभ्यासकाच्या मते कापसाच्या दरात सुधारणा होऊन कापूस भाव 8500/9500च्या दरम्यान राहु शकतात. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.