गुढीपाडवा आणि डॉ आंबेडकर जयंती निमित्त 100 रुपयांत शिधा वाटप मंत्रीमंडळाचा निर्णय

 गुढीपाडवा आणि डॉ आंबेडकर जयंती निमित्त 100 रुपयांत शिधा वाटप मंत्रीमंडळाचा निर्णय

100 रुपयांत शिधा वाटप

 

राज्यातील या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी आहे. गुढीपाडवा आणि डॉ आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 100 रुपयांत आनंंदाचा शिधा देण्याचा निर्णय 22/02/2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.याचा लाभ राज्यातील 01 कोटी 63 लाख रेशन कार्ड धारकांना होईल. याआधी असा आनंदाचा शिधा दिवाळीच्या सणानिमित्त देण्यात आला होता.

 

खताचे दर ऑनलाइन पध्दतीने पाहता येनार खतविक्रेत्याकडुन होतेय फसवणूक

 

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि अमरावती व औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्र्यरेषे वरील केशरी शेतकरी रेशन कार्डधारकांना 01 किलो रवा, 01 किलो हरभराडाळ, 01 किलो साखर आणि 01 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढीपाडव्या पासून पुढील एक महिन्याच्या वेळेसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपयांत प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा देण्यात येईल.

 

 

 

 

रेशनकार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यासाठी आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या वेळेत निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. याआधी 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति-संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17-कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख एवढ्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली.

 

आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आल्या आहे लाभार्थी यादी पहा

 

grampanchayat आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आल्या लाभार्थी यादी पहा

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा