या शेतकर्याला हेक्टरी 15 हजार रुपये बोनस शासन निर्णय आला.
नमस्कार शेतकरी बांधवांनो ; राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधी मंत्रीमंडळात बैठकीत घेतला होता पण त्याचा शासन निर्णय (GR) दि. 24/फेब्रुवारी /2023 रोजी घेण्यात आला असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकर्याला सामील केले जाईल असे महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2022-23 साठी केंद्रशासनाने धानाची आधारभूत किंमत (हमीभाव) साधारण
धानासाठी 2040 रुपये तर अ ग्रेड धानासाठी 2060 रुपये एवढी निश्चित केलेली आहे. चालू हंगामात राज्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, धान उत्पादनाचा वाढता खर्च तसेच कोरोना सारख्या महामारीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहे. चालु हंगाम 2022-23 करिता किमान आधारभूत किंमत ( हमीभाव) खरेदी योजनेंतर्गत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या आहेत.
किमान आधारभूत किंमत ( हमीभाव ) खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादना करिता त्यांच्या धान लागवडीखालील
जमीनीनुसार प्रती हेक्टरी 15000 रुपये याप्रमाणे (02 हेक्टर मर्यादेत) प्रोत्साहनपर रक्कम वाटप करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात यावी. ही धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम फक्त 2022-23 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी च लागू राहील.
शेतकरी मित्रांनो हे 15000 हजार रुपये बोनस कोणत्या शेतकर्याला दिले जाणार, तसेच यासाठी कोणत्या अटी, शर्ती शासनाने घातल्या आहेत आणि हे अनुदान कधी मिळनार हि सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून शासन निर्णय (GR) पहा
👉शासन निर्णय(GR) येथे पहा👈
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302241234291906.pdf