यंदा देशावर अल निनोचे संकट देशात मान्सून कमी होनार El Nino

यंदा देशावर अल निनोचे संकट देशात मान्सून कमी होनार El Nino

El Nino

देशात तीन वर्षे चांगला पाऊस पडलेला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी देखील झालेली आहे. या अतिवृष्टीने चालू हंगामातील पिके गेली होती पण ह्या जास्त पावसाचा मोठा फायदा शेतकर्याला झाला होता. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे बागायत पिकाला धोका राहिला नव्हता. पण येत्या वर्षात पाऊस कमी पडनार अशी माहिती अमेरिकन हवामान विभागाने दिली आहे. US Weather Servicev अमेरिकन हवामान विभाग (NOAA) यांनी दिलेल्या अहवाल नुसार, सलग तीन वर्षे चांगला मान्सून देऊन ला नीना (La Nino) निरोप घेत आहे.

 

भारताच्या मान्सून ला सुद्धा आता अल निनो (El Nino) चा धोका आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिल. अल निनोची स्थिती मे-जुलै दरम्यान राहु शकते आणि याच कालावधीत जुन मध्ये मान्सून (Monsoon) दाखल होत असतो. देशातील पावसाळ्याचा काळ हा जुन ते सप्टेंबर असुन जुन ते आॅगस्ट दरम्यान अल निनोचा प्रभाव असु शकतो. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान एनसोन्युट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे.

 

 

NOAA ने सांगितल्या प्रमाणे अल निनोचा (El Nino) परीणाम थेट भारतातील मान्सून वर होणार आहे. अल निनो बद्दल अमेरिकन हवामान संस्थेकडून हा अंदाज वर्तवण्यात आहे. याआधी जानेवारी मध्ये एजन्सी ने असाच अंदाज वर्तवला होता. पण जानेवारी च्या अहवालात जुलै नंतर अल निनोची स्थिती निर्माण होईल असे सांगितले होते.

 

 

 

(El Nino) अल निनो सक्रिय होण्याची शक्यता किती.

तज्ञांच्या मते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये अल निनो 57 ℅ पर्यंत सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या तज्ञांच्या मते पावसाळ्यात हि स्थिती कशी असेल हे एप्रिल-मे दरम्यान स्पष्ट होईल.

 

 

 

(Indian Meteorological Department) भारतीय हवामान तज्ञांचे काय मत आहे?

अमेरिकन हवामान तज्ञांनी (US Weather Service) दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवामान खात्याचे मत आहे (Indian Meteorological Department) कि मान्सून बद्दल काहीही बोलने हे घाईचे होईल. एजन्सी ने परिस्थिती पाहून अंदाज दिलेला आहे तरी त्यानंतरच्या महिण्यात काही बदल होऊ शकतो. जर एखादे माॅडेल सारखे 02 महिने अल निनो चे (El Nino)  संकेत देत असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. असे कोट्टायम येथील इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज स्टडीजचे संचालक डि शिवानंद पै यांचे मत आहे.

 

खताच्या भावात मोठी वाढ जाणून घ्या नवीन 2023 मधिल खताचे दर

 

 

 

(El Nino) अल निनो म्हणजे काय ?

अल निनो हा एक जलवायु प्रणाली चा भाग असून हवामानावर त्याचा परिणाम होतो. दर 03 ते 06 वर्षानी अल निनो ची परीस्थिती उद्भवते. मध्य आणि पूर्व विषुववृत्ताच्या प्रशांत महासागरातील पृष्ठभागावर पाणी सामान्य पेक्षा गरम होते या स्थिती ला अल निनो म्हणतात. या स्थिती मुळे वार्याची पद्धत बललते त्याचा परिणाम जगातील अनेक भागात हवामानावर होतो.(Monsoon)

 

 

 

अल निनो (El Nino) याआधी कधी होता?

याआधी सन 2004,2009,2014 आणि 2018 मध्ये अल निनो होता, या सर्व वर्षात देशात दुष्काळ पडला होता. तसाच अंदाज 2023 मध्ये आहे.

 

 

 

राज्यातील कापूस बाजारभाव एवढी वाढ येथे मिळाला सर्वाधिक दर👇👇

राज्यात कापूस पोहचला 8850 रुपयावर cotton market

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा