कापसाचे भाव 10000 पार होतील का,या महिन्यात कसे आसतील कापसाचे भाव
मागील 3-4 दिवसापासून कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. काही ठिकाणी क्विटलमागे 500-800 रूपयांची वाढ पहायला मिळाली .देशातील कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट झाल्यानं तसेच वायदे बाजार सुरू झाल्यावर कापसाच्या भावात सुधारणा पहायला मिळत आहे.आणि पुढील काही दिवसात कापसाच्या भावात आनखी वाढ होउ शकते. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकानी व्यक्त केला आहे.
कापूस बाजारात येन्यापुर्वी यंदा विक्रमी उत्पादन आसल्याचं सांगितलं गेलं,मात्र त्यानंतर हळूहळू उत्पादन अंदाज कमी होत गेला.CAI च्या नवीन अहवालानुसार यंदा देशात 321 लाख गाठी उत्पादन होईल आसं सांगितले गेलंय,पण यामध्ये अजूनही कपात होउ शकते.
मागील बरेच दिवस कापसाचे भाव पडलेले होते,मात्र उत्पादन कमी होनार आसल्याच्या अहवालानंतर मात्र कापसाच्या भावात उसळी आली.15 आणि 16 फेब्रुवारी सलग दोन्ही दिवस आकोट येथे कापसाला 8850 रूपये भाव मिळाले.मात्र हे भाव जास्तीत जास्त आहेत सर्वसाधारण दर हे यापेक्षा कमी होते.राज्यातील ईतर बाजारसमीत्यामध्ये कापसाच्या भावात वाढ झाली आहे 8000-8500 रूपये भाव सध्या कापसाला मिळतोय.
कापसाचे भाव 10000 पार होतील का,या महिन्यात कसे आसतील कापसाचे भाव
आता कापूस उत्पादन घटल्याचं उद्योगानीही मान्य केलं आहे, तसेच बंग्लादेशमध्ये आणि ईतर देशामध्ये कापूस निर्यात सूरू आहे.तसेच उद्योगही पुर्ण क्षमतेने सुरू होत आहेत यामुळेच कापसाच्या भावात सुधारणा होत आहे.फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव सरासरी 8500 रूपये राहू शकतो असे जानकार सांगतात.
यंदा सर्वाधिक दर किती मीळू शकतो…?10000+ होईल का?
देशातील उत्पादन अंदाज, लागवड क्षेत्र,कापसाची मागणी,शिल्लक गाठी,अंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, निर्यात धोरन लक्षात घेता यंदाच्या हंगामात कापूस दरपातळी 8500-9500 रूपये राहू शकते असे कापूस बाजारातील जानकार सांगतात.
निर्यात धोरन,मागणी,उत्पादन यामध्ये बदल झाल्यावर भाव यापेक्षा कमी किंवा जास्तही होउ शकतात त्यामुळे परिस्थिती पाहून कापसाची विक्री करनं गरजेचं आहे.
गुजरातमध्ये कापसाला काय भाव मिळतोय जानून घ्या👇👇