कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी या उपाययोजना करण्याची गरज

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी या उपाययोजना करण्याची गरज…..

कांदा उत्पादक

नमस्कार शेतकरी बांधवांनो : आपल्या महाराष्ट्रात तसेच देशात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण सध्या कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक सविता शेळके यांनी म्हटले आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले आहे.

 

रांऊडअपच्या निर्बंधांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार जाणून घ्या

 

सध्या राज्यातील बर्याच जिल्ह्यातील कांद्याची आवक लासलगाव बाजार समिती मध्ये होते असुन येथे कांद्याला कमीत कमी 400 तर जास्तीत जास्त 1100 तर सर्वसाधारण 700 रु दर मिळत आहे. या दरामध्ये शेतकर्याचा उत्पादन खर्च तर सोडाच पण वहातूक खर्च सुध्दा काढणे अवघड झाले आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने काही आवश्यक ऊपाय योजना करणे गरजेचे आहे.

 

आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला पहा आजचे कांदा बाजारभाव

 

 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी या उपाययोजना करण्याची गरज…..

 

1) निर्यात व्यवहार भारतीय चलनात व्हावेत.
2) कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू ठेवावी.
3) निर्यातदारांना किसान रेल उपलब्ध व्हावी.
4) देशांअंतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणाऱ्या खरेदीदारांना वाहतूक अनुदान द्यावे.
5) कांद्याला किमान 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे.
6) किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी.
7) निर्यातीसाठी त्वरित कंटेनर मिळवून द्यावा.
8) कांदा निर्यात प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू करावी.

 

 

अरे वा ! महाडीबीटी शेतकरी अनुदान योजनांची लॉटरी यादी जाहीर, पहा तुमचं व गावातील लोकांचे नाव ! 👇🏻

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी 15-फेब्रुवारी-2023 Mahadbt lottery list

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा